घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बोरवंड तालुका परभणी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ठिकाणी दररोज वर्गीकरण करुन (ओला व सुखा) प्रक्रियेकरीता येणारे अंदाजे 130 ते 140 मेट्रीक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बोरवंड व धार रोड येथे असलेला २८९००० टन जुना घनकचरा (LEGACY WASTE) वर बायोमायनिंग पध्दतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे.
घनकचऱ्यातुन निघणाऱ्या लिचेटवर प्रक्रिया करणे.
घनकचऱ्यावर प्रक्रिया करुन शिल्लक राहणारे इर्नट मटेरीयलची विल्हेवाट लावणेकरीता सॅनिटरी लॅण्डफिल्ड साईट तयार करणे,
परभणी शहर महागनरपालिका क्षेत्रातील बोरवंड ता. परभणी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ठिकाणी मिश्र घनकचऱ्यावर १०० टन क्षमतेच्या मेकॅनिकल प्रोसेसिंग प्लांट वर प्रक्रिया करण्यात येत आहे.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बोरवंड येथील 10 टन क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे त्यातून वीज निर्मिती करण्यात येत आहे व त्या विजेचा वापर सदरील प्रकल्पावर उपयोग केले जात आहे.
भविष्यात वाढ होणाऱ्या लोकसंखेचा विचार करुन घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाकरीता आवश्यक जागा, तंत्रज्ञाण निश्चित करणे घनकचरा प्रस्ताव सादर करणे.