Welcome to : PCMC Parbhani

  • About Corporation

    • Home
    • About Corporation

    नगर सचिव विभागाकडील माहिती

    ·        परभणी शहर महानगरपालिका स्थापना वर्ष – २०११

    ·        वर्गवारी : ‘ वर्ग महानगरपालिका

    ·        सदस्य संख्या : ६५ (लोकनियुक्त)

    ·        क्षेत्रफळ : ५७.६० चौ.कि.मी.

    ·        महानगरपालिका स्थापणे पासून महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढ करावयाची असल्यास एक गावाचा समावेश व एक गावाचे शिवारातील काही भाग यांचा समावेश होऊ शकतो.


    महाराष्ट्रर राज्यागतील परभणी शहर हे परभणी जिल्ह्यापचे मुख्यालय आहे. परभणी शहर महानगर पालिकेची ची स्थाहपना सन 2011 साली झालेली आहे.परभणी शहर महानगर पालिका “ड” वर्ग महानगर पालिका असून शहराचे क्षेत्रफळ 57.61 चौ.किलोमिटर आहे. परभणी शहराची समुद्र सपाटी पासून सरासरी उंची 538 मीटर एवढी आहे. परभणी शहरातील एकुण रस्यान ची लांबी 692 कि.मी. एवढी आहे. परभणी शहराचे सरासरी पर्जन्यलमान सरासरी 750 मि.मी. ऐवढे आहे. परभणी शहराची 2011 च्या. जनगणनेनुसार लोकसंख्यात 307170 असून पुरुष 157625 व महिला 149563 लोकसंख्याख आहे. 6 वर्षाखालील बालकांची लोकसंख्याु 18888 म्ह णजेच परभणी शहराच्याख 6.15% एवढी आहे. स्त्रीक-पुरूष लिंग गुणोत्त‍र 948 असून ते महाराष्ट्रप राज्या्च्या 929 सरासरी लिंग गुणोत्तसरापेक्षा जास्तग आहे. परभणी शहराची साक्षरता प्रमाण 73.34% आहे, जे की महाराष्ट्रर राज्याुच्या 82.34% सरासरी साक्षरता प्रमाणापेक्षा कमी आहे.

    परभणी शहर हे विभागीय आयुक्तक कार्यालय, औरंगाबाद पासुन 210 कि.मी. अंतरावर आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र 222 (कल्याण – निर्मल ) या वर स्थित आहे. परभणी शहर हे मनमाड काचीगुडा या रेल्वे लाईन वर तसेच परभणी – परळी या रेल्वे मार्गाच्या जंक्शनवर आहे तसेच परळी वैजयनाथ व औंढा नागनाथ या धार्मिक स्थळा पासून 72 कि.मी. व 50 कि.मी. अंतरावर आहे. शहरात हजरत तुराबुल हक्क दर्गा तसेच पारदेश्वर मंदिर असे प्रेक्षणिय स्थ5ळे असून वसंतराव नाईक कृषी विद्यापिठा मुळे परभणी शहराची शैक्षणिक दृष्ट्या वेगळी ओळख आहे . या शहरात मुख्यठतः मराठी, हिंदी, दक्कथनी उर्दू, मारवाडी इत्या दी भाषा बोलल्यात जातात. या शहराचे प्रमुख वैशिष्टथ म्हदणजे या ठिकाणी 110 वर्षा पासून प्रसिद्ध संत हजरत तुराबुल हक्क यांच्या नावाने दर वर्षी 02 फेब्रुवारी ला उर्स (जत्रा) भरतो. परभणी परिसरात प्रामुख्यावने ऊस, कापूस, ज्वा री, गहू, सोयाबीन या सारखी सर्व पिके मोठ्या प्रमाणात उत्पा दन केले जाते.

    The City's Population
    PopulationMenWomenHomeless
    30717015652015065069
    Total LiterateMenWomenOther
    2252981237601015380
    TotalSCScheduled Tribe
    Total307170376675450
    Total Men156520188223632
    Total Women150650188451818
    Educational Status
    Primary SchoolSecondary and Higher Secondary SchoolsCollegeNumber of Primary Schools under The MunicipalNumber of Students
    1826422181023